

पुणे, ता. २५ : राज्यात थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.ई/बी.टेक) प्रवेशाची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत तीन हजार ७५६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बुधवार (ता.२६) ते शुक्रवार(ता.२८)पर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) राबविण्यात आलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत तिसऱ्या यादीत ३६ हजार ८०३ विद्यार्थ्यांपैकी तीन हजार ७५६ नवीन विद्यार्थ्यांना प्रवेशाची प्रथमच संधी मिळाली आहे. तिसऱ्या यादीत तीन हजार ७९० विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे, तर २० हजार १२७ विद्यार्थ्यांनी बेटरमेंटचा पर्याय निवडला आहे. तिसऱ्या फेरीसाठी गुणवत्ता यादीतील ७० हजार ३८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. त्यात दिलेल्या मुदतीत ३६ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले होते. याच विद्यार्थ्यांचा विचार तिसऱ्या फेरीसाठी करण्यात आला.
पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑटो फ्रिज झाले आहेत. या विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी काही कारणाने प्रवेश नाकारल्यास त्यांना चौथ्या फेरीत सहभागी होता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना थेट त्यानंतरच्या खुल्या फेरीत म्हणजे संस्थात्मक फेरीत सहभागी होता येईल, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
- तिसऱ्या फेरीत प्रवेशासाठी संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कालावधी, प्रवेश निश्चित करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करून शुल्क भरून प्रवेश घेणे : २६ ते २८ ऑगस्ट (सायंकाळी पाचपर्यंत)
- चौथ्या फेरीसाठी तात्पुरत्या रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : २९ ऑगस्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.