
Engineering Admissions
Sakal
AICTE Rules Maharashtra : प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत नियम डावलून प्रवेश दिलेल्या महाविद्यालयांवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नेमलेले निरीक्षक विभागीय तंत्र शिक्षण कार्यालयात सविस्तर अहवाल देतील. महाविद्यालयांचे हे अहवाल पुढील कार्यवाहीसाठी प्रवेश नियामक प्राधिकरणाकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर नियमबाह्य प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर प्राधिकरणामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे तंत्र शिक्षण विभागाच्या पुणे विभागीय कार्यालयाने स्पष्ट केले आहे.