
पुणे : अभियांत्रिकीच्या प्रवेशातील अडथळ्यांमुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थी आता पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीबाहेर जाऊन भविष्यात उपयुक्त ठरणाऱ्या अभ्यासक्रमांचे नवे पर्याय शोधत आहेत. यामध्ये पारंपरिक बी.एस्सी.ऐवजी संगणकशास्त्र, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती-तंत्रज्ञान, रोबोटिक्स, मशिन लर्निंग अशा आधुनिक ‘बी.एस्सी’ अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे.