
मंचर : अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील २७ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील तहसीलदार कार्यालयाला बुधवारी (ता.१६) भेट दिली. यावेळी कामकाजाची माहिती तहसीलदार संजय नागटिळक व निवडणूक नायब तहसीलदार डॉ.सचिन वाघ यांनी दिली. प्रथमच तहसील कार्यालयातील कामकाज पाहण्याची मिळालेली संधी व प्रशासनाकडून करण्यात आलेले आदरतिथ्य पाहून विद्यार्थी भारावून गेले.