डुंबरवाडी येथील विद्यार्थ्यांचे
खोडदच्या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत यश

डुंबरवाडी येथील विद्यार्थ्यांचे खोडदच्या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत यश

Published on

ओतूर, ता. ७ ः खोडद येथील (ता. जुन्नर) जीएमआरटीने विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात १३० शाळा, २७० महाविद्यालये व २२ संशोधन संस्थांनी सहभाग घेतला होता. या विज्ञान प्रदर्शनामध्ये डुंबरवाडी येथील शरदचंद्र पवार इंजिनिअरिंग कॉलेजच्या एआय अँड एमएल विभागामधील ओम अहिरे, पृथ्वीराज जुंदरे, चेतन शेवाळे, सोहम सुंकी या विद्यार्थ्यांनी ‘‘टिच कनेक्ट’’ या प्रकल्पासाठी तृतीय क्रमांक पटकावला.
विशेष म्हणजे महाविद्यालयातील एआय अँड एमएल इंजिनिअरिंग शाखेची ही पहिली बॅच असून त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश मिळवले. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवे बळ मिळाले असून इतर विद्यार्थ्यांनाही संशोधन व नवकल्पनांसाठी प्रेरणा मिळाली आहे.
या प्रकल्पासाठी प्रा. पल्लवी घोलप व प्रा. सुमित लोहटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे, सचिव वैभव तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. यु. खरात तसेच संगणक विभागप्रमुख डॉ. सुनील खताळ, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स विभागाचे प्रमुख प्रा. नीता बानखेले, एआय अँड एमएल विभागाच्या प्रमुख डॉ. पूजा घोलप, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा. सचिन जाधव, प्रथम वर्ष समन्वयक प्रा. सिद्धेश पानसरे, कार्यालय अधीक्षक विशाल बेनके यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com