

PNE26W50908
अहिल्यानगर ः सीक्यूएव्हीचे ब्रिगेडियर राजीव चावला यांच्या हस्ते अभियंता दिनाचे दीपप्रज्वलन करण्यात आले. समवेत द्विज काबरा, डॉ. अनिरुद्ध अडसूळ, मनोहर अणेकर, डॉ. दीपक विधाते आदी.
नावीन्यता हा विकसित भारताचा पाया
ब्रिगेडियर राजीव चावला ः अभियंता दिन उत्साहात साजरा
अहिल्यानगर, ता. १८ : विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अभियंत्यांनी नवीन संकल्पनांवर संशोधन करावे. संशोधन, नावीन्यता आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून देशाच्या प्रगतीला गती मिळू शकते, असे प्रतिपादन ब्रिगेडियर राजीव चावला यांनी केले.
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), अहिल्यानगर स्थानिक केंद्राच्या वतीने अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ‘टिकाऊ आणि तंत्रज्ञानिक स्वावलंबी भारतासाठी अभियांत्रिकी उत्कृष्टता’ या मध्यवर्ती संकल्पनेवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. गुणवत्ता आश्वासन नियंत्रक (वाहने) (सीक्यूएव्ही), अहिल्यानगरचे नियंत्रक ब्रिगेडियर राजीव चावला प्रमुख म्हणून बोलत होते. भाग्यलक्ष्मी मिल (जालना) येथील रिसर्च अँड डेव्हलपमेंट हेड व संचालक द्विज काबरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष व अडसूळ टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. अनिरुद्ध अडसूळ, संस्थेचे माजी अध्यक्ष मनोहर अणेकर, मानद सचिव डॉ. दीपक विधाते, आयईआय अहिल्यानगर स्थानिक केंद्राचे अध्यक्ष भारतभूषण भागवत आदी उपस्थित होते.
कार्यकारिणी सदस्य अरविंद पारगावकर, अविनाश कुलकर्णी, प्रकाश गांधी, हरिश्चंद्र थिगळे, रामनाथ वायकर, मधुकर बालटे, जी. सी. मोटगी आदींनी कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी परिश्रम घेतले. डॉ. दीपक विधाते यांनी प्रास्ताविक केले. ॲड. अभय राजे व प्रा. डॉ. दादासाहेब करंजुले यांनी सूत्रसंचालन केले. सहमानद सचिव प्रदीप तांदळे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.