इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे, पण मराठी भाषाही सक्तीची करा | Girish Bapat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे, पण मराठी भाषाही सक्तीची करा
इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे, पण मराठी भाषाही सक्तीची करा

इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे, पण मराठी भाषाही सक्तीची करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विश्रांतवाडी - शिक्षण हे जीवन यशस्वी करण्यासाठी आवश्यक आहे. काम करणारा प्रत्येक माणूस महत्त्वाचा असतो. शहरात काम करणारे अनेक नगरसेवक आहेत परंतु अनिल टिंगरे यांनी महापालिकेत कसे काम करावे याचा आदर्श निर्माण केला आहे. प्रभागातील विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून धानोरी प्रभागाचा कायापालट नगरसेवक अनिल टिंगरे यांनी केला असून विकासाचे काम प्रामाणिकपणे करणार्‍या कार्यकर्त्यांच्या मागे जनता कायमच उभी राहते असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले. नगरसेवक अनिल टिंगरे यांनी धानोरी प्रभागात उभारण्यात आलेल्या 25 लक्ष लिटर पाण्याच्या टाकीच्या व बी.जी.टी (बबन गबाजी टिंगरे) ई लर्निंग स्कूल उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

धानोरी मुंजाबावस्ती हा मध्यमवर्गीय कष्टकरी वर्गातील नागरिकांचा भाग आहे. या भागात पूर्वी पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होती परंतु मागील दहा वर्षात नगरसेवक अनिल टिंगरे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यासोबतच येथील मध्यमवर्गीयांना गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे यासाठी बीजीटी ई लर्निंग स्कूल उभी केल्यामुळे भविष्यात कायमस्वरूपी लक्षात राहील असे महत्त्वपूर्ण विधायक काम नगरसेवक अनिल टिंगरे यांनी केले आहे. पुणे शहराचा खासदार म्हणून सर्व पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्ते यांचं योग्य कामासाठी मी कायमच त्यांच्या पाठीशी असल्याचे मत खासदार बापट यांनी व्यक्त केले. माणूस बोलत नाही त्याचे काम बोलते अशा शब्दांत त्यांनी धानोरी प्रभागातील विकासकामांचे कौतुक केले. नागरिकांच्या हिताची विकास कामे केल्यास मतदार त्याला कायम लक्षात ठेवतात. त्यामुळे चांगली विकासाची कामे करणारा नगरसेवक म्हणून अनिल टिंगरे यांना या भागातील सुज्ञ जनता पुन्हा नक्कीच संधी देईल असे देखील त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

हेही वाचा: एसटी संपाचा टीईटी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना बसला फटका

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार जगदीश मुळीक, वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार बापुसाहेब पठारे, रघुनाथ कुचिक, नगरसेवक नाना सांगडे, राहूल भंडारे नगरसेविका ऐश्वर्या जाधव, नितीन भुजबळ, संतोष खांदवे, आनंद गोयल, भीमराव गलांडे, रमेश आढाव, मोहनराव शिंदे-सरकार, सुनिल खांदवे, राजेंद्र खांदवे, मनोज पिल्ले, धनंजय जाधव, बाबुराव टिंगरे, संतोष राजगुरु, संतोष टिंगरे, चंद्रकांत जंजीरे, बाळासाहेब टिंगरे, मनोज आगरवाल, धनंजय टिंगरे, लिंगू साखरे, शामा जाधव, तेजश्री पुरंदरे यांसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

या शाळेबाबत माहिती देताना नगरसेवक अनिल टिंगरे म्हणाले, की पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून धानोरीतील मुंजाबावस्ती याठिकाणी विकसीत करण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीमध्ये स्वागतकक्ष, 14 वर्ग खोल्या, 1 संगणक खोली, 1 सांस्कृतिक हॉल, मुख्यध्यापक कक्ष, शिक्षक खोली, तसेच प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमधील खेळाडूवृत्तीस वाव मिळावा या हेतूने भव्य मैदान देखील विकसित करण्यात आले आहे. शाळेस 100 फुटी डीपी रस्ता असून प्रशस्त अशा पार्किंगचीदेखील व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागास शाळा तात्काळ हस्तांतर करून लवकरात लवकर पालिकेच्याच माध्यमातून शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी टिंगरे यांनी सांगितले.

हेही वाचा: पावसाळी वाहिनीत अडकलेल्या कुत्र्याची सुटका

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदीश देशपांडे, शैलेश रणनवरे, सुभाष पाटील, जितू जगताप, प्रकाश सुतार, अविनाश दिवेकर, शशिकांत भोसले, माउली पडवळ, कैलास भारती, विवेक पाटील, योगेश निरभवणे, संतोष कदम, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर सरोदे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन विशाल टिंगरे यांनी केले.

आमदार सुनील टिंगरे भाषणात म्हणाले की, सत्ता कुणाचीही येवो, धानोरीच्या हातात तिजोरीच्या चाव्या द्या. यावर खासदार गिरीश बापट यांनी भाषणात याला उत्तर देताना सांगितले की, आम्ही तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या देऊ,पण मास्टर चावी आमच्या हातात राहील. यावर श्रोत्यांमध्ये हास्याची लाट पसरली.

loading image
go to top