जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीला पर्याय नाही - अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

मराठी ही आपली मातृभाषा टिकलीच पाहिजे पण इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. त्यामुळे आपल्या मुलांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीतून शिक्षण घेण्याशिवाय पर्याय नाही.

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीला पर्याय नाही - अजित पवार

लोहगाव - मराठी (Marathi) ही आपली मातृभाषा (Mother Language) टिकलीच पाहिजे पण इंग्रजी (English) ही जागतिक भाषा (Global Language) आहे. त्यामुळे आपल्या मुलांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीतून शिक्षण (Education) घेण्याशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांना मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करता आला पाहिजे. हवेली पंचायत समितीचे अशोक खांदवे यांना दोनवेळा सभापती पद सांभाळण्याची संधी मिळाली होती. त्यातून त्यांनी या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास केला. अत्यंत शांत, संयमी व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा सामान्य वर्गातील कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले.

लोहगाव-वडगाव शिंदे रस्त्यावर ब्रिलिएन्ट स्कूलच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, संयोजक अशोक खांदवे, कमल ढोले-पाटील, प्रकाश म्हस्के, पांडुरंग खेसे, माधव काळभोर, अभिषेक बारणे, अरुण चौधरी, ब्रिलिएन्ट स्कूलचे संस्थापक बाळकृष्ण खांदवे, प्रीतम खांदवे, अर्जुन गरुड, निलेश पवार, हरिदास मोझे, सुभाष काळभोर, स्वाती खांदवे, विजय खांदवे, दत्तात्रय खांदवे, हेमलता शिंदे, मंगल जंगम, रत्नमाला तळेकर उपस्थित होते.

हेही वाचा: चोरीच्या रिक्षाचा वापर करुन प्रवाशांची लुटमार, पोलिसांकडून एकास अटक

अशोक खांदवे म्हणाले, अजित पवार यांच्यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्याला राज्यातील सर्वाधिक मोठ्या हवेली पंचायत समितीचे दोनदा नेतृत्व करता आले. शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे म्हणून ब्रिलिएन्ट स्कूलची स्थापना केली. या शाळेत सुरुवातीला केवळ सुमारे साठ विद्यार्थी शिक्षण घेत होते, आज सहा वर्षांच्या काळात या शाळेचा वटवृक्ष झाला असून याठिकाणी शेकडो विद्यार्थी माफक दरात केंद्रीय बोर्डाचे शिक्षण घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका एनी जॉन यांनी केले.

Web Title: English Has No Choice But To Survive In The Global Competition Ajit Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ajit Pawarpunemarathi