
पुणे : महापालिकेच्या शाळांना पुरविल्या जाणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) स्कूल बस सेवेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महिला सुरक्षारक्षक मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शाळा सुरू झाल्यानंतर महिला सुरक्षारक्षक पीएमपीएलच्या स्कूल बसमध्ये नेमण्याची प्रक्रिया होणार आहे. त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून पावले उचलण्यात येऊ लागली आहेत.