esakal | बारामतीच्या महाविद्यालयात ईआरपी कोर्स सुरु; काय आहे हा कोर्स जाणुन घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

Vidya Pratishthans College of Engineering baramati

अभियांत्रिकी, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेचे पदवीधर या कोर्ससाठी  अर्ज करू शकतात.  पहिल्या सत्रामध्ये ईआरपी सिस्टमची मूलभूत माहिती आणि तिचे वेगवेगळे मॉड्यूल याचा अंतर्भाव आहे....

बारामतीच्या महाविद्यालयात ईआरपी कोर्स सुरु; काय आहे हा कोर्स जाणुन घ्या

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती- येथील विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांचा एन्टरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग हा (ईआरपी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु होत आहे. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी विशेष सहकार्य केले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजनकुमार बिचकर यांनी या बाबत माहिती दिली. 

सॅप हे नावाजलेले सॉफ्टवेअर असून ते ईआरपी या संकल्पनेवर आधारलेले असून ते विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात शिकण्यास मिळणार आहे. पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सन 2013 पासून हा अभ्यासक्रम सुरु झालेला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आंट्आ मार्गदर्शक योजने अंतर्गत बारामतीत हा अभ्यासक्रम सुरु होणार आहे. 17 ऑगस्ट पासून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु होणार आहे. 30 विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रवेश घेता येणार आहे. पुण्याच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे संचालक डॉ. आहुजा यांनी या संदर्भात बारामतीतील बैठकीत माहिती दिली. या प्रसंगी विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, खजिनदार रमणिक मोता, विश्वस्त अँड. नीलीमा गुजर, डॉ. राजीव शहा, प्राचार्य डॉ. राजनकुमार बिचकर सीओईपी चे प्राध्यापक डॉ.सौ. आरती मुळे, वैशाली गायकवाड आणि प्रायमस टेकसिस्टिम चे मुख्य कार्यकारी अध्यक्ष संभाजी चवळे उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सदर कोर्सचा कालावधी हा एक वर्ष असून त्यामध्ये तीन सत्र असणार आहेत. अभियांत्रिकी, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेचे पदवीधर या कोर्ससाठी अर्ज करू शकतात. पहिल्या सत्रामध्ये ईआरपी सिस्टमची मूलभूत माहिती आणि तिचे वेगवेगळे मॉड्यूल याचा अंतर्भाव आहे. दुसऱ्या सत्रामध्ये विशेष भर प्रात्यक्षिकांवर दिलेला असून यामध्ये विद्यार्थ्यास त्याने निवडलेल्या मॉड्यूल्स मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त करण्याची संधी आहे. शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने दिलेल्या कंपनीमध्ये किमान 4 महिने इंटर्नशिप करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळेल. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना सीओईपी पुणे संस्थेचे पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन ईआरपी असे प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थी SAP ग्लोबल प्रमाणपत्राची परीक्षा देऊ शकतात.  

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सीओईपी मध्ये आतापर्यंत हा कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना डेलोइट, टीसीएस, टाटा ऑटो कॉम्प, कोलगेट पामोलिव्ह, स्लॅमबर्गर, प्रायमस टेकसिस्टिम, कॅपजेमिनी, एल अँड टी इन्फोटेक, वोक्सवॅगन, टीएटो, पियाजिओ व्हेइकल्स, आयबीएम, रिलायन्स जिओ, कॉग्निझंट, फिनोलेक्स केबल आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे.