जेजुरी रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार खंडोबा देवस्थानच्या रूपात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

जेजुरी देवस्थानचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्रवाशांना कळावे, तसेच पर्यटकांमध्ये वाढ व्हावी, या उद्देशासाठी रेल्वे प्रशासनाने अनोखे पाऊल उचलले आहे. जेजुरी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारे हे जेजुरी देवस्थानच्या प्रतिकृतीचे साकारले आहे. त्यामुळे स्थानकास आकर्षक रूप आले आहे.

पुणे - जेजुरी देवस्थानचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्रवाशांना कळावे, तसेच पर्यटकांमध्ये वाढ व्हावी, या उद्देशासाठी रेल्वे प्रशासनाने अनोखे पाऊल उचलले आहे. जेजुरी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारे हे जेजुरी देवस्थानच्या प्रतिकृतीचे साकारले आहे. त्यामुळे स्थानकास आकर्षक रूप आले आहे.

रेल्वेच्या पुणे-सातारा मार्गात जेजुरी स्थानकाला तेथील देवस्थानामुळे महत्त्व आहे. मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी पुणे रेल्वेचे विभागीय संचालक मिलिंद देऊस्कर यांच्या संकल्पनेतून जेजुरी स्थानकाचा कायाकल्प करण्यात आला. स्थानकाची इमारत आणि प्रवेशद्वार हे देवस्थानच्या प्रतिकृती निर्माण करण्यात आले आहे. याबरोबरच स्थानकावर प्रवाशांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.

स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात आली असून प्रवाशांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी वाटर फिल्टर लावण्यात आले आहे. याबरोबर स्थानकाला खंडोबा देवस्थानचे स्वरूप दिल्याने प्रवाशांनी स्थानकाची स्वच्छता राखत देवस्थानचे पावित्र जपावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The entrance to the Jejuri Railway Station as Khandoba Temple