वाई:-जिद्द आणि कष्टातूनच उद्योजक घडतात: ''थर्माकोल मॅन''रामदास माने.

वाई:-जिद्द आणि कष्टातूनच उद्योजक घडतात: ''थर्माकोल मॅन''रामदास माने.

Published on

जिद्द, कष्ट अन् संघर्षातूनच घडतात उद्योजक

थर्माकोल मॅन रामदास माने; वाईत ‘किसन वीर’मध्ये पारितोषिक वितरण

वाई, ता. ३ : आजची मुलं म्हणतात नवा उद्योग करण्यासाठी भांडवल आणि जागा द्या; पण खरंतर उद्योग करायला केवळ पैसा किंवा जागा लागत नाही, तर प्रबळ जिद्द लागते. निर्मिती ही सहजपणे नाही, संघर्ष आणि कष्टातूनच होते. या संघर्षाचा हसत खेळत सामना करण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केल्यास ते यशस्वी उद्योजक बनून समाजाचे प्रश्न सोडवू शकतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक आणि ‘थर्माकोल मॅन’ म्हणून ओळख असणारे रामदास माने यांनी केले.


येथील किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले अध्यक्षस्थानी होते. पुणे सिनियर केंब्रिज कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रशांत कुलकर्णी, उदय गुजर, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे उपस्थित होते.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘बदलत्या जगात नोकऱ्यांचे स्वरूप अनिश्चित असले, तरी दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवून काम करणारी माणसेच टिकून राहणार आहेत. या बाबतीत रामदास माने हे विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहेत.’’

श्री. भोसले यांनी शिक्षण आणि शहाणपण यातील फरक स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षित न होता ‘कळते’ होणे महत्त्वाचे आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्तेसोबतच चारित्र्य, शिस्त आणि मूल्यांची जोड द्या, असा सल्लाही त्यांनी दिला. प्राचार्य डॉ. फगरे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. उपप्राचार्य डॉ. अर्जुन जाधव यांनी पाहुण्यांची ओळख दिली. पर्यवेक्षक श्रावण पवार यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक अहवाल, तर क्रीडा शिक्षक सचिन चव्हाण यांनी क्रीडा क्षेत्रातील यशस्वी कामगिरीचा अहवाल सादर केला.

यावेळी महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव झाला. शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील पारितोषिके देण्यात आली. नयना भोसले, स्वप्नगंधा जाधव व सुमीत वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक प्रतिनिधी शीतल माने यांनी आभार मानले. सलोनी सरतापे आणि गौरव वायदंडे यांनी पसायदान सादर केले.
कार्यक्रमास वाई पालिकेतील विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, संस्थेचे संचालक, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
-----
चाैकट
.........

उद्योजकतेचे धडे...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत असतानाच येथे एआय, मशरूम निर्मिती, स्पिरुलिना आणि फोटोग्राफी यांसारखे कोर्सेस सुरू करून उद्योजकतेचे धडे दिले जात असल्याचे प्राचार्य डाॅ. फगरे यांनी सांगितले.


B07649
वाई : कार्यक्रमात बोलताना रामदास माने. त्या वेळी डॉ. प्रशांत कुलकर्णी, उदय गुजर, मदन भोसले, डॉ. गुरुनाथ फगरे, अर्जुन जाधव आदी.
..............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com