Pune Tourism Policy : पर्यटनस्थळांवर आता शुल्क आकारणार; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, लवकरच नवीन धोरण
Pune News : पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर आता प्रवेशासाठी शुल्क आकारले जाणार असून सुरक्षेचे नवे धोरण तयार केले जात आहे. कुंडमळा येथे पूल, दर्शक गॅलरी आणि संरक्षित उपाययोजना लवकरच अंमलात येणार आहेत.
पुणे : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जाणाऱ्या नागरिकांकडून आता शुल्क आकारले जाणार आहे. पर्यटनस्थळांची सुरक्षितता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी दिली.