पुणे - पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी खेड शिवापूर ते रावेतदरम्यान ३२.४ किलोमीटर लांबीचा नवीन सेवारस्ता तयार होणार आहे. दोन मार्गिका असणारा हा रस्ता असून, यासाठी ६०४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्यालयाने याला मंजुरी दिली आहे.