esakal | पावसाळा संपला तरी भामा आसखेड भरता भरेना!
sakal

बोलून बातमी शोधा

Even though the rain ended Bhama Askhed dam yet not fill

सध्या परतीचा पाऊस झाला तर धरण भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.परंतु मागील वर्षीपेक्षा यावर्षी धरण अजून भरले नसल्याने शहरी भागातील लोकांसह शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

पावसाळा संपला तरी भामा आसखेड भरता भरेना!

sakal_logo
By
रुपेश बुट्टेपाटील-आंबेठाण

आंबेठाण : पुणेकरांसह खेड, शिरूरचे लक्ष लागलेले भामा आसखेड धरण(ता.खेड)पावसाळा संपत आला तरी अद्याप भरले नाही.सध्या धरणात जवळपास ९९ टक्के पाणीसाठा झाला आहे.मागील वर्षी ४ ऑगस्टलाच धरण शंभर टक्के भरले होते तर आजच्या तारखेपर्यंत म्हणजे ३ ऑक्टोबर २०१९ पर्यंत धरणातून एकूण पाणी क्षमतेच्या जवळपास दीडपट पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास दोन महिने उशिर होऊनसुद्धा धरण भरले नाही.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या परतीचा पाऊस झाला तर धरण भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.परंतु मागील वर्षीपेक्षा यावर्षी धरण अजून भरले नसल्याने शहरी भागातील लोकांसह शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

खेड तालुक्यासह शिरूर आणि दौंड तालुक्याला वरदान ठरणाऱ्या भामा आसखेड धरणात सध्या (दि.०३) सकाळी सहा वाजेपर्यंत ९८.७३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा कमी असून मागील वर्षी आजच्या दिवशी धरण शंभर टक्के भरले होते. यावर्षी धरण भरण्यास उशीर होत असल्याने शेतकऱ्यांसह या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शहरी भागातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.सुरुवातीला धरण भरणार की नाही याची नागरिकांना धास्ती वाटत होती परंतु हळूहळू पुरेसा पाऊस झाल्याने धरण भरण्याकडे वाटचाल करू लागले.काही दिवसांत परतीचा पाऊस सुरू होईल त्याने तरी धरण भरेल असा आशावाद आता व्यक्त केला जात आहे.

शरद पवार संतापले; 'उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आहे, यावर कवडीचा विश्वास राहिला नाही!'

बहुतांश चाकण एमआयडीसीसह चाकण शहर आणि तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागातील गावांसाठी याचा फायदा होणार आहे. भविष्यात शेतीपेक्षा पिण्याच्या पाण्यासाठी धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात वापरले जाणार आहे.

''भामा आसखेड धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी आहे. खेडच्या पश्चिम भागात भामा आसखेड हे मातीचे धरण आहे.चालू वर्षी एक जून पासून धरण क्षेत्रात ८८० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे तर काल दिवसभरात करंजविहिरे परिसरात ११ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.'' अशी माहिती शाखा अभियंता बी.आर.खेडकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक के. डी. पांडे यांनी दिली आहे. धरणात सध्या ८.०४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे तर जिवंत पाणीसाठा हा ७.५७ टीएमसी इतका आहे.

 शरद पवार संतापले; 'उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आहे, यावर कवडीचा विश्वास राहिला नाही!'

धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौड या तीन तालुक्यांना होत असतो. त्यामुळे हे धरण तीनही तालुक्यांना वरदान ठरले आहे.

loading image
go to top