इसीएचएस लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन सुविधा

आता घरबसल्या मिळवा औषधोपचाराचा खर्चाचा परतावा; ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतून औषध, उपचार आदींचा खर्च मिळणार परत
ECHS
ECHSsakal

पुणे : माजी सैनिक अंशदायी आरोग्य सेवा योजनेचा (इसीएचएस) माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबाला आता घरबसल्या ऑनलाइन लाभ घेता येणार आहे. इसीएचएस विभागाच्या वतीने वैद्यकीय खर्चाचा परतावा मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करत ऑनलाइन बिलिंग प्रक्रिया’ कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी विभागाने ‘आयपीडी मॉड्यूल’ विकसित केले आहे.

ECHS
'सारथी' मार्फत तरुणांना स्थानिक उद्योगांचे प्रशिक्षण द्या

गेल्या वर्षापासून इसीएचएस लाभार्थी नियमित औषधांसाठी शहरातील ठराविक इसीएचएस पॉलिक्लिनिक ऐवजी खासगी रुग्णालय किंवा मेडिकलमधून वैद्यकीय सेवा व औषधे घेत आहेत. यासाठी इसीएचएसतर्फे खर्चाचा परतावा मिळतो, मात्र  त्यासाठी लाभार्थ्यांना कागदपत्रे घेऊन संबंधित पॉलिक्लिनिकमध्ये जावे लागत होते. ऑफलान असलेल्या या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच इसीएचएस विभागाला ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागत होता. यावर तोडगा म्हणून लाभार्थ्यांसाठी ही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  

ECHS
संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते होणार सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचा सत्कार

‘‘या प्रणालीमुळे आता इसीएचएस लाभार्थ्यांच्या वेळेची बचत होणार आहे. पूर्वी जर एकाच वेळी २०० किंवा ५०० इसीएचएस लाभार्थ्यांच्या परताव्याचे अर्ज आले तर, त्यांची प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक पॉलिक्लिनिकमध्ये केवळ एकच केंद्र कार्यरत होते. त्यामुळे कागदपत्रांची पाहणी करणे व इतर प्रक्रियेसाठी वेळ लागत होता. मात्र आता या सुविधेमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. दरम्यान ऑनलाइन अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास संबंधित पॉलिक्लिनिकला कळविल्याने या प्रणालीत सुधारणा करता येईल.’’

- कमांडर (निवृत्त) रवींद्र पाठक, इसीएचएस सल्लागार समितीचे सदस्य

  • एकाच वेळी माजी सैनिक व त्यांच्‍या कुटुंबीयांतील सदस्यांचा एकत्रित परतावा मिळणार नाही

  • प्रत्येक सदस्याला परताव्यासाठी स्वतंत्रपणे नोंद करणे आवश्‍यक

  • ऑनलाइन अपलोड करून मूळ कागदपत्रांना संबंधित इसीएचएस पॉलिक्लिनिकला पाठविणे गरजेचे

  • ही कागदपत्रे १५ दिवसांच्या आत संबंधित पॉलिक्लिनिकमध्ये पोचणे आवश्‍यक

  • मूळ कागदपत्रांच्या पडताळणीनंतर खर्चाच्या परताव्याची प्रक्रिया सुरू

  • वैद्यकीय खर्चाचा परतावा मिळविण्यासाठी संबंधित रुग्णालय किंवा मेडिकलचे बिल गरजेचे

ECHS
आमदार कुल यांनी जबाबदारीने बोलावे व वागावे : रमेश थोरात

या प्रणालीचा फायदा

  • कधी आणि कोठूनही खर्चाच्या परताव्यासाठी अर्ज भरणे शक्य

  • तासनतास पॉलिक्लिनिकमध्ये थांबण्याची गरज नाही

  • लवकरात लवकर औषधोपचाराच्या खर्चाचा परतावा मिळणार

येथे करा अर्ज ः

इसीएचएस लाभार्थ्यांना वैद्यकीय खर्चाचा परतावा मिळविण्यासाठी https://uat.utiitsl.com/ECHS/  या संकेतस्थळाचा वापर करता येइल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com