
पुणे : सैन्य दलातील जवानाच्या घरातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला वानवडी पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून १३ लाख ७७ हजार रुपये किमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. आरोपी हा पूर्वी सैन्य दलातच शिपाई पदावर कार्यरत होता, तो राजस्थानमधून नोकरी सोडून पळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.