कोपर्डे हवेली : जागृती विद्यामंदिरात दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळ..
‘जागृती’त दहावीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कोपर्डे हवेली, ता. १५ : बनवडी येथील शिक्षण मंडळ संचलित जागृती विद्यामंदिरात दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रम उत्साहात झाला.
विकास भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी परीक्षेच्या तयारीबाबत मनाची एकाग्रता, वेळेचे व्यवस्थापन आणि आत्मविश्वास याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांतर्फे लक्ष्मी पोतनीस, आदेश लाडे, सई करांडे, ओंकार नलवडे, अश्विनी सुतार, प्रांजली क्षीरसागर, अनन्या जगताप यांनी मनाेगत व्यक्त केले. इयत्ता नववीतील ज्ञानेश्वरी चव्हाण हिचेही मनोगत झाले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंकरराव खापे, उपाध्यक्ष किशोर पाटील, खजिनदार कांतिलाल पाटील, सचिव बी. बी. कोठावळे, विनायक माळी, संचालक विश्वनाथ पांढरपट्टे, शिवाजी करांडे, कासम शेख, अशोक नलवडे, संचालिका फरिदा मुल्ला, मुख्याध्यापक सुधाकर चव्हाण, आनंदा वाकुर्डे यांची उपस्थिती होती. वर्गशिक्षिका जयश्री कदम यांनीही मार्गदर्शन केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. आर. डी. कांबळे यांनी आभार केले.
B02429,
बनवडी ः कार्यक्रमात बाेलताना शंकरराव खापे. त्या वेळी मान्यवर. (जयंत पाटील : सकाळ छायाचित्रसेवा)
...........................................................

