पुणे महापालिकेच्या भरतीसाठी सोमवारी परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Exam

महापालिकेतील हजारो पद रिक्त आहेत, त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. राज्य सरकारने महापालिकेच्या पदभरतीवरील बंदी उठविल्यानंतर आता टप्प्याटप्याने भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

पुणे महापालिकेच्या भरतीसाठी सोमवारी परीक्षा

पुणे - पुणे महापालिकेतील नोकरभरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदांसाठीची परीक्षा सोमवारी (ता. २६) होणार आहे. इतर पदांसाठी इतर दिवशी परीक्षा होणार आहे.

महापालिकेतील हजारो पद रिक्त आहेत, त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. राज्य सरकारने महापालिकेच्या पदभरतीवरील बंदी उठविल्यानंतर आता टप्प्याटप्याने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण ४४८ पदांसाठी ८७ हजार ४७१ अर्ज आले आहेत. सरळसेवेतून कर्मचारी नियुक्त करण्यासाठी ‘आयबीपीएस’ या संस्थेमार्फत आॅनलाइन परीक्षा घेऊन कर्मचारी निवड केली जाणार आहे.

भरतीच्या पहिल्या टप्प्यात कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी २६ सप्टेंबरला परीक्षा होणार आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी तीन ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे. चार ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी, तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा होईल.

या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्र तपासणीनंतर थेट नियुक्ती केली जाणार आहे. या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार नाही. तसेच ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून कोणत्याही व्यक्ती, एजंटावर विश्‍वास ठेवू नये, आर्थिक व्यवहार करू नयेत असे आवाहन उपायुक्त सचिन इथापे यांनी केले आहे.

Web Title: Examination For Pune Municipal Corporation Recruitment On Monday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..