esakal | महिला सैन्य पोलिसपदाची पुण्यात २५ जुलैला परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Women Police Recruitment

महिला सैन्य पोलिसपदाची पुण्यात २५ जुलैला परीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुण्यातील सैन्य भरती (Army Recruitment) कार्यालयाच्या वतीने महिला सैन्य पोलिसपदाच्या जनरल ड्यूटी भरतीसाठी (Recruitment) एकत्रित प्रवेश परीक्षेचे (सीईई) (CEE) आयोजन केले आहे. ही परीक्षा येत्या २५ जुलै रोजी पुणे कॅन्टोन्मेंट येथील मिल्खासिंग क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार आहे. (Examination of Women Army Police Post in Pune on 25th July)

या भरती प्रक्रियेसाठीचे शारीरिक व वैद्यकीय चाचणी ही पहिली दोन टप्पे फेब्रुवारी २०२१ दरम्यान पार पडली. या दोन्ही टप्प्यात उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्यातील ६३ महिला उमेदवारांसाठी ही परीक्षा आहे. अंतिम गुणवत्ता यादी लेखी परीक्षेनंतर घोषित केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीईईला उपस्थित असणाऱ्या सर्व उमेदवारांना भरती कार्यालयाच्या वतीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

loading image