येरवड्याच्या जेल रस्त्यावरील खोदाईमुळे वाहतुकीला अडथळा | Yerwada Jail Road | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येरवड्याच्या जेल रस्त्यावरील खोदाईमुळे वाहतुकीला अडथळा
येरवड्याच्या जेल रस्त्यावरील खोदाईमुळे वाहतुकीला अडथळा

येरवड्याच्या जेल रस्त्यावरील खोदाईमुळे वाहतुकीला अडथळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोहगाव - येरवड्यात जेल रस्त्यावर कॉमरझोन आयटी पार्क चौकात मोठी खोदाई करण्यात आली आहे. याठिकाणी चिखल साठला असून वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. मात्र याठिकाणी कुठलाही माहितीफलक नसल्याने हे काम नेमके कोण करत आहे, हे कुणालाच सांगता येत नाही.

या चौकात जेल रस्त्यावर विश्रांतवाडी, टिंगरेनगर, जात पडताळणी कार्यालय व कारागृहाकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. येथेच कॉमरझोन आयटी पार्क असून या आयटी पार्कची वाहने व त्यासमोर असलेल्या विविध अतिक्रमणांचा वाहतुकीच्या अडथळ्यात भर पडतो. त्यातच भर चौकात अनेक दिवसांपासून भलामोठा लांब खड्डा खोदून ठेवण्यात आला आला आहे. या खड्ड्याच्या आजूबाजूला तीन-चार बॅरिगेट वगळता कुठलीही सुरक्षा यंत्रणा उभारलेली दिसत नाही.

तसेच याठिकाणी कुठलेही कर्मचारी उपस्थित दिसत नाहीत. या खड्ड्याच्या बाजूला जलवाहिनीच्या दोन व्हॉल्व्हमधून रस्त्यावर पाणी वाहताना दिसते. या खड्ड्यालगत केलेली खोदाई नीट बुजवण्यात आलेली नाही. त्यामुळेही रस्त्यावर आणखी खड्यांची भर पडली आहे. या सर्व परिस्थितीतून वाहनचालकांना वाट काढावी लागत असून खड्ड्यांमध्ये वाहने आदळत आहेत.

याबाबत माहिती देताना पथ विभागाचे शाखा अभियंता रवींद्र पाडळे म्हणाले, सदरचे काम महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे (एमएनजीएल) आहे. याबाबत त्यांना त्वरित सूचना देण्यात येतील.

loading image
go to top