अतिवृष्टीच्या नुकसानाची भरपाई मिळेल -खासदार सुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhor

अतिवृष्टीच्या नुकसानाची भरपाई मिळेल - खासदार सुळे

भोर : ‘‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, भोर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळेल,’’ अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. अतिवृष्टीमुळे भोर तालुक्याच्या आंबवडे खोऱ्यातील पान्हवळ, करंजे नाझरे, वडतुंबी, टिटेघर गावातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर टिटेघर येथे झालेल्या कार्यक्रमात सुळे यांनी माहिती दिली.

यावेळी त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून अडचणी समजून घेतल्या. पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार भोर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातखाचरांच्या तालींचे आणि बांबूच्या शेतीचे पंचनामे पुन्हा करण्यात येणार असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले.

हेही वाचा: आंबिल ओढा प्रकरण; अधिकाऱ्यांना नोटीस बजावणार

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, उपसभापती लहू शेलार, भोर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धारणे, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष गणेश खुटवड, रामदास जेधे, भिकू निगडे, अरविंद जाधव, मनोज खोपडे, केतन चव्हाण, सुहित जाधव, नितीन कुडले, रोहिदास जेधे, संदीप खाटपे, बबन साळेकर, विशाल खोपडे आदी उपस्थित होते.

Web Title: Excessive Rain Damage Will Be Compensated Mp Sule

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Supriya SuleNCPbhor
go to top