esakal | हुरहूर निर्माण करणारी ‘अनोळखी भेट’
sakal

बोलून बातमी शोधा

अनोळखी भेट

हुरहूर निर्माण करणारी ‘अनोळखी भेट’

sakal_logo
By
- नीला शर्मा

कधी कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीशी झालेल्या भेटीतूनही मनाला भावणारं काही तरी गवसतं. त्याआधी कधीच भेट झालेली नसतानाही त्या व्यक्तीशी फार जुनी ओळख असल्यासारख्या गप्पा होतात.

कधी कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीशी झालेल्या भेटीतूनही मनाला भावणारं काही तरी गवसतं. त्याआधी कधीच भेट झालेली नसतानाही त्या व्यक्तीशी फार जुनी ओळख असल्यासारख्या गप्पा होतात. ही व्यक्ती पुन्हा भेटणार नाहीच, हे ठाऊक असूनही तिच्यापाशी कळतनकळतपणे मन मोकळं केलं जातं. असाच काहीसा दृश्य - श्राव्य अनुभव ‘अनोळखी भेट’ या लघुपटातून येतो.

एका बस थांब्यावर एक तरुण व तरुणी उभे आहेत. बराच वेळ झाला तरी बस येत नाही म्हणून दोघेही रिक्षा थांबवतात. ‘स्टेशन,’ असं दोघेही म्हणत असताना तिसराच प्रवासी रिक्षात बसून निघून जातो. ती विचारते, ‘तुम्हाला स्टेशनला जायचं आहे, हे मघाशी रिक्षावाल्याच्या निमित्ताने कळलं. चला, आपण चालत जाऊ.’ जाताना सहज बोलण्यातून तिला समजतं की, तो बाहेरगावचा आहे. नोकरीसाठी दिलेली ही सत्ताविसावी मुलाखत. खूप वैताग आला आहे. ती त्याला सांगते, ‘बहुतेक यावेळी तुम्हाला नक्की संधी मिळेल. तीही लग्नासाठी स्थळ बघायला या शहरात आल्याचं, अगदी ओघात बोलून जाते. अनोळखी तरुणाबरोबर वाटचाल करताना सुरक्षिततेचा विचार मनात आला नाही का, असं तो विचारतो.’ ‘आम्हा मुलींना कोण, कसं आहे ते आपसूक कळतं,’ असं उत्तर ती देते. दोघांच्या मनमुक्त संवादाची परिणती काय होते, हे आवर्जून या चित्रकृतीतून पहायला हवं.

अभिनेत्यांनी वाढविली रंगत

दर्शन कांबळे लिखित व अभिषेक हाडवळे दिग्दर्शित या मराठी लघुपटात, प्रथम वारघडे आणि कृत्तिका मोंडे या अभिनेत्यांनी रंगत आणली आहे. तेरा मिनिटे, पन्नास सेकंदाचा हा चटपटीत लघुपट यु-ट्यूबवर उपलब्ध आहे. ‘कलाकार हाउस’ची ही निर्मिती दोन दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आली आहे.

loading image
go to top