चित्रपट संग्रहालयाचे ‘चित्रांजली@७५’चे ऑनलाइन फिल्म पोस्टर्स प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

चित्रपट संग्रहालयाचे ‘चित्रांजली@७५’चे ऑनलाइन फिल्म पोस्टर्स प्रदर्शन

पुणे : देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. याचाच भाग म्हणून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने ‘चित्रांजली @७५ : अ प्लॅटिनम पॅनोरमा’ या ऑनलाइन फिल्म पोस्टर्सचे आयोजित केले आहे. (Pune News)

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या ७५ वर्षातील ठळक घटनांचा मागोवा याद्वारे घेण्यात आला आहे. या डिजिटल संग्रहात स्वातंत्र्यसेनानी, सैनिकांचे शौर्य चित्रित झालेल्या चित्रपटांची झलक आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ‘आयकॉनिक विक ऑफ आझादी का अमृत महोत्सव’ या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून हे प्रदर्शन आयोजित केले आहे.

या प्रदर्शनाचे उद्‌घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. ‘‘भारतीय सिनेमा ही देशाची ‘सॉफ्ट पॉवर’ असून जागतिक व्यासपीठावर भारताची ओळख निर्माण करण्यात या चित्रपटसृष्टीचे योगदान महत्त्वाचे आहे.’’, असे मत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये

  1. ७५ फिल्म पोस्टर्स, छायाचित्रे याद्वारे भारतातल्या विविध भाषांमधील चित्रपटातले देशभक्तीचे विविध रंग दाखवण्यात आले आहेत.

  2. - प्रदर्शनात ‘सिनेमाच्या कॅमेरा नेत्रातून स्वातंत्र्यलढा’, ‘सामाजिक सुधारणांविषयीचे चित्रपट’ आणि ‘वीर सैनिकांना सलाम’ असे हे तीन विभाग आहेत.

  3. - उल्लेखनीय चित्रपट : सुरेंद्र आणि सुरैया यांचा अभिनय असलेला ‘१८५७’ (हिंदी, १९४६), चेतन आनंद दिग्दर्शित युद्धावरील ‘हकीकत’ (हिंदी, १९६४), जगभरात प्रशंसा मिळविलेला रिचर्ड ॲटनबरो दिग्दर्शित चरित्रात्मक चित्रपट ‘गांधी’ (इंग्रजी/हिंदी,१९८२), ओम बेदी दिग्दर्शित शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट ‘ शहीद ए-आझम भगतसिंग’ (पंजाबी, १९७४), पदांदी  मुंडुकू (तेलुगू, 1962) - स्वातंत्र्य चळवळ केंद्रस्थानी असलेला व्ही. मधुसूधन राव यांनी दिग्दर्शित केलेला ‘पदांदी  मुंडुकू’ (तेलुगू, १९६२) हा राजकीय चित्रपट

‘चित्रांजली@७५’ हे प्रदर्शन :

- हे प्रदर्शन पाहण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी ‘https://www.nfai.gov.in/virtual-poster-exhibition.php’ येथे क्लिक करा.

Web Title: Exhibition Of Online Film Posters Of Chitranjali 75 Of The Film Museum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newsexhibition