esakal | पुणेकरांनो पालिकेच्या एक दिवसाच्या ऑनलाइन सभेचा खर्च बघा

बोलून बातमी शोधा

पुणेकरांनो पालिकेच्या एक दिवसाच्या ऑनलाइन सभेचा खर्च बघा

महापालिकेची सभा ऑनलाइन घेण्यासाठी मुख्य सभागृहासह सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांत यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने इंटरनेट, कॅमेरे, एलईडीचा समावेश आहे. त्याचा खर्च सात लाखांपर्यंत आहे.

पुणेकरांनो पालिकेच्या एक दिवसाच्या ऑनलाइन सभेचा खर्च बघा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यासाठी एका दिवसाचा खर्च सात लाखांपर्यंत असल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे सोमवारची (ता. ८) सभा जेमतेम १४ मिनिटांत तहकूब झाल्याने इतका खर्च वाया गेल्याचे स्पष्ट झाले. ‘सभेचा खर्च सात लाख रुपये नाही. जो काही असेल, तो मांडू,’ असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

Success Story: नोकरी सांभाळत 'ती' झाली ‘सीए’; एकत्र कुटुंबाची मिळाली साथ!​

महापालिकेची सभा ऑनलाइन घेण्यासाठी मुख्य सभागृहासह सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांत यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने इंटरनेट, कॅमेरे, एलईडीचा समावेश आहे. त्याचा खर्च सात लाखांपर्यंत आहे. मुळात सभेचे कामकाजच १४ मिनिटे सुरू राहिल्याने खर्च वाया गेल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा