पुण्यात कुत्र्यानं गिळला लाखोंचा हिरा अन् पोटातून निघाले 'हे'... 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

हिरा ही अशी गोष्ट आहे जी सर्वांनाच भुरळ घालते. या हिऱ्यावर माणूसच नाही तर एक प्राणीही भुलला आहे आणि त्यानं चक्क हिरा गिळला. कुत्र्यानं हिरा गिळला हे ऐकूनच  अनेकांना धक्का बसतो.

पुणे : माणसाच्या जीवनात सोने-नाणे, पैसा-अडका याला खुप महत्व आहे. काही लोकांना या गोष्टींचा मोठा शौक असतो. तसेच काही जणांना हिरा ही अत्यंत महागडी असणारी बाब, मात्र याचा संचय करण्याचा छंद असतो. 

हिरा ही अशी गोष्ट आहे जी सर्वांनाच भुरळ घालते. या हिऱ्यावर माणूसच नाही तर एक प्राणीही भुलला आहे आणि त्यानं चक्क हिरा गिळला. कुत्र्यानं हिरा गिळला हे ऐकूनच  अनेकांना धक्का बसतो. पुण्यात अशीच एक घटना समोर आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हिरा व्यापाऱ्याच्या कुत्र्याने खेळताना लाखो रुपये किंमत असलेले दोन हिरे गिळले. त्यानं हिरे गिळल्यानंतर लोक घाबरून गेले. या घटनेनंतर हिरा व्यापारी तातडीनं कुत्राला दवाखान्यात घेऊन गेला.

रुग्णालयात श्वानावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रिया करून हिरा बाहेर काढता येईल असं डॉक्टरांना वाटलं पण प्रत्यक्षात ऑपरेशन दरम्यान जे घडलं ते पाहून डॉक्टरांनाही आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. कारण कुत्राच्या पोटातून दोन्ही हिरेच नव्हे तर एक सुई, कोटची दोन बटणे, रबर वायर आणि काही धागेही डॉक्टरांनी बाहेर काढले.

दरम्यान याबाबत डॉक्टरा म्हणाले की या क्षणी कुत्रा ठीक आहे आणि हिरा व्यापाऱ्यांनी त्याला घरी परत आणले आहे. डॉक्टरांनी असेही म्हटले आहे की कदाचित कुत्रा चमकणाऱ्याया गोष्टींकडे आकर्षित झाला असेल, म्हणून त्याने सुई, रबर आणि कोटचे बटण खाल्ले असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expensive diamond swallowed by a dog