Shankar Mahadevan Event : शंकर महादेवन यांच्या स्वरांची जादू अनुभवा; ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे मैफिलीचे आयोजन

हिंदी व मराठी चित्रपटसंगीतात आपला ठसा उमटवणारे प्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन यांच्या संगीत मैफिलीची पर्वणी पुणेकरांना मिळणार.
shankar mahadevan
shankar mahadevansakal
Updated on

पुणे - आपल्या बहारदार आवाजाने आणि वैविध्यपूर्ण गीतांनी हिंदी व मराठी चित्रपटसंगीतात आपला ठसा उमटवणारे प्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन यांच्या संगीत मैफिलीची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘शंकर महादेवन- लाईव्ह इन कॉन्सर्ट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शंकर महादेवन हे ३० वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘ब्रेथलेस’, ‘मितवा’, ‘सिनेमावाले’, ‘गल्ला गुडियाँ’, ‘खलबली’, ‘दिल चाहता है’ यांसारखी त्यांनी गायलेली अनेक गीते लोकप्रिय आहेत. त्यांनी एहसान आणि लॉय यांच्यासह ‘दिल चाहता है’, ‘कल हो ना हो’, ‘तारे जमीन पर’, ‘लक बाय चान्स’, ‘झनकार बीट्स’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘२ स्टेट्स’, ‘दिल धडकने दो’ अशा अनेक यशस्वी चित्रपटांना संगीतही दिले आहे.

‘शंकर महादेवन- लाईव्ह इन कॉन्सर्ट’ या कार्यक्रमात यातील बहुतांश गीते ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ महादेवन आणि शिवम महादेवन हे देखील सहभागी होणार आहेत. हे दोघेही तरुण पिढीतील प्रतिभावान कलाकार असून त्यांनी स्वतंत्रपणे हिंदी व मराठी चित्रपट संगीत क्षेत्रात काम केले आहे.

कार्यक्रमाविषयी

लवकरच या कार्यक्रमाची तारीख व वेळ जाहीर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com