Usha Uthap Live In Concert : अनुभवा भारतीय पॉप संगीताच्या सम्राज्ञीची मैफील

भारतीय पॉप संगीताची सम्राज्ञी, अशी ओळख असलेल्या प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांची मैफील अनुभवण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार.
Usha Uthap
Usha Uthapsakal
Updated on

पुणे - भारतीय पॉप संगीताची सम्राज्ञी, अशी ओळख असलेल्या प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांची मैफील अनुभवण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. सकाळ माध्यम समूहातर्फे १९ एप्रिलला ‘उषा उत्थुप लाइव्ह इन कॉन्सर्ट’ या मैफीलीचे आयोजन केले आहे.

ही विशेष मैफील सायंकाळी ६.३० वाजता कर्वेनगरच्या डीपी रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स येथे रंगणार आहे. यासाठी ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ हे ‘फायनान्स पार्टनर’ असून ‘द नेचर-मुकाईवाडी’, ‘वन वर्ल्ड बिझिनेस कन्सल्टंट’ आणि ‘डॉक्टर्स युनाइटेड वर्ल्डवाईड’ हे सहयोगी प्रायोजक आहेत.

उषा उत्थुप यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गानशैलीमुळे चित्रपट संगीतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मैफीलीत उत्थुप यांची ‘वन टू च च च’, ‘हरि ओम हरि-हरि ओम हरि’, ‘रंबा हो हो, संबा हो’, ‘उरी उरी बाबा’, ‘है ये माया’, ‘डार्लिंग, आँखों से आँखे चार करने दो’, ‘रम्बा मै सम्बा’ आदी लोकप्रिय गीते रसिकांना ऐकायला मिळणार आहेत.

या कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरू झाली असून तिकिटे आरक्षित करण्यासाठी bookmyshow.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा बातमीसोबत दिलेला क्युआर कोड स्कॅन करा, असे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे.

आपल्या दमदार आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या उषा उत्थुप यांना प्रत्यक्ष मैफीलीत ऐकण्याची ही सुवर्णसंधी आहे. हिंदी चित्रपटगीतांचे चाहते असणाऱ्या रसिकांसाठी ही मैफील चुकवू नये, अशीच आहे. या दर्जेदार कार्यक्रमाचा एक भाग असण्याचा अतिशय आनंद वाटतो.

- सुशील जाधव, विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि.

‘सकाळ’तर्फे पुणेकरांसाठी नेहमीच दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. ही मैफील या कार्यक्रमांमधील मुकुटमणी ठरणार असून रसिकांना अतिशय आनंद देणारी ठरेल, याची खात्री वाटते.

- सुशीलकुमार देशमुख, संचालक, ‘द नेचर-मुकाईवाडी’

कार्यक्रमाविषयी

  • कधी : १९ एप्रिल, शनिवार

  • केव्हा : सायंकाळी ६.३० वाजता

  • कुठे : महालक्ष्मी लॉन्स, डीपी रस्ता, कर्वेनगर

‘लोकमान्य’च्या सभासदांना सवलतीच्या दरात तिकिटे

‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’च्या सभासदांना या कार्यक्रमाची तिकिटे सवलतीच्या दरात मिळणार आहेत. त्यासाठी ९०२२१७३५९७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com