Pune News : ईश्वरी भिसे मृत्‍यू प्रकरणी ससूनमध्ये तज्ज्ञांच्या समितीची बैठक

तज्‍ज्ञांची समिती करणार ईश्वरी भिसे मृत्‍यू प्रकरणी कागदपत्रांची तपासणी
ishwari bhise
ishwari bhisesakal
Updated on

पुणे - गर्भवती ईश्‍वरी भिसे यांच्‍या मृत्‍यू हा वैद्यकीय निष्‍काळजीपणामुळे झाला का याबाबत ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडून (मेडिकल बोर्ड) आज (ता. १५) बैठक होणार असून त्‍यामध्‍ये मृत्‍यू प्रकरणी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

या समितीमध्‍ये भिसे यांचा मृत्‍यूची जबाबदारी नेमकी कोणाची यावर चर्चा होईल. समितीच्‍या निष्‍कर्षाचा अहवाल अलंकार पोलिसांकडे सुपूर्त केला जाऊन त्‍यानुसार पुढील कारवाईची नेमकी दिशा ठरू शकणार आहे.

ईश्वरी भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्‍णालयात अनामत रकमेअभावी उपचार न मिळाल्याचा आरोप केला जात आहे. नातेवाइकांनी त्‍याबाबत अलंकार पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी त्‍यांचे जबाब नोंदवले आहेत.

अलंकार पोलिसांनी भिसे कुटुंबीयांसह दीनानाथ रुग्णालय, सूर्या रुग्णालय, मणिपाल रुग्णालय आणि इंदिरा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर या सर्व ठिकाणचे संबंधितांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. पोलिसांनी सर्व रुग्णालयांमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.

सर्व माहिती संकलित करून ससून रुग्णालयातील समितीला सादर करण्यात आली आहे. ते जबाब पोलिसांनी ससूनच्‍या मेडिकल बोर्डाकडे सुपूर्त केले असून या प्रकरणात वैद्यकीय निष्‍काळजीपणा झाला आहे का याबाबत मत देण्‍याची विनंती केली आहे. त्‍यानुसार या समितीची आज बैठक होणार असल्‍याची माहिती ससून रुग्‍णालयाने दिली.

भिसे यांच्‍या मृत्‍यूबाबत आधीच तीन समित्यांनी चौकशी केली आहे. यामध्ये आरोग्य विभागाची समिती, धर्मादाय सहआयुक्त समिती आणि मातामृत्यू अन्वेषण समितीचा समावेश आहे. या तिन्ही समित्यांचे अहवाल शासनाला सादर करण्यात आले आहेत. त्‍यातच आता ससूनच्‍या समितीचा अहवाल देखील महत्त्वाचा आहे.

ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीची आज बैठक होइल. यामध्ये भिसे प्रकरणातील सर्व कागदपत्रे समितीकडून तपासली जातील. त्‍यामध्‍ये काही त्रुटी आढळून आल्यास उर्वरित कागदपत्रे मागवली जातील. समितीमध्ये ससूनचे वैद्यकीय अधीक्षक यांच्‍यासह, स्त्रीरोग विभागप्रमुख, औषधशास्त्र विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख, भूलशास्त्र विभागप्रमुख, बालरोगतज्ज्ञ विभागप्रमुख अशा सहा जणांचा समावेश आहे.

- डॉ. यल्लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com