पोस्टाच्या विमा योजनांचे पुनरुज्जीवन 31 डिसेंबरपर्यंत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

पॉलिसी ज्या खंडित झालेल्या असतील तसेच पॉलिसी सुरू केल्यापासून सतत 5 वर्षे भरणा न केल्याने बंद पडल्या असतील, तर त्यांना पुनरुज्जीवित करत सर्वसामान्य विमाधारकांना विमा लाभ मिळू शकतो.
 
पुणे : केंद्र सरकारच्या टपाल जीवनविमा योजना आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेअंतर्गत बंद झालेल्या पॉलिसी 31 डिसेंबरपर्यंत पुनरुज्जीवित करता येतील, अशी माहिती भारतीय डाक विभागाचे अधीक्षक बी. पी. एरंडे यांनी दिली.

पॉलिसी ज्या खंडित झालेल्या असतील तसेच पॉलिसी सुरू केल्यापासून सतत 5 वर्षे भरणा न केल्याने बंद पडल्या असतील, तर त्यांना पुनरुज्जीवित करत सर्वसामान्य विमाधारकांना विमा लाभ मिळू शकतो.

पॉलिसीचे पुनरुज्जीवन करताना विमाधारकांचे स्वस्थ असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे आवश्‍यक असल्याचे डाक विभागाने कळविले. तसेच विमा लाभ मिळविण्यासाठी पॉलिसीधारकांनी जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये लेखी अर्ज करता येईल. दरम्यान 31 डिसेंबरनंतर पॉलिसीचे पुनरुज्जीवन केले जाणार नसून, त्या त्वरित रद्द केल्या जातील.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expired postal insurance policies can be retrieved before 31st December!

टॅग्स
टॉपिकस