
भारतीय संस्कृतीमधील प्राचीन, पौराणिक रहस्ये आपल्याला काही तरी सांगू पाहत आहेत. प्रत्येक प्रतीक आणि मिथकाचे काही तरी स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळेच आपल्या असण्यालाही एक वेगळी ओळख मिळते. व्यक्तीचा आध्यात्मिक प्रवास हा एकांतात सुरू होतो. गर्दीमध्ये तुम्हाला स्वत:चा शोध घेता येणार नाही, असे सूचक मत लेखक, इतिहासकार, पटकथा लेखक आणि गीतकार अक्षत गुप्ता यांनी मांडले. आतापर्यंत झालेला स्वतःचा आध्यात्मिक प्रवास आणि ऐतिहासिक, पौराणिक लिखाणाबाबत त्यांचे विचार सकाळ प्रस्तुत- सुहाना स्वास्थ्यममध्ये ऐकायला मिळतील. या पार्श्वभूमीवर गोपाळ कुलकर्णी यांनी त्यांच्याशी साधलेल्या संवादाचा संपादित अंश.