खडकी - येथील दारूगोळा कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला. कार्तिक बर्मन (वय २०, रा. सिस्टर्स क्वार्टर्स, खडकी) असे मृत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, कार्तिकचा कामाचा पहिलाच दिवस होता..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यातील एका सेक्शनजवळ स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू आहे. कार्तिक तेथे बांधकाम साहित्य पुरवण्याचे काम करत होता. दुपारी काम आटोपल्यानंतर तो एका खोलीच्या पायरीवर बसला होता. तेथे त्याच्या हाताला एक संशयास्पद वस्तू लागली आणि तिचा जोरदार स्फोट झाला. ती वस्तू कोणती होती, याची अधिक माहिती अजून मिळालेली नाही..या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या कार्तिकचा मंगळवारी (ता. ९) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर ॲम्युनिशन फॅक्टरी वर्कर्स युनियनने प्रशासनाला घेरले आहे. काम सुरू असलेल्या भागात ही स्फोटक वस्तू कशी आली? कंत्राटी कामगाराला अतिसंवेदनशील विभागात काम करण्याची परवानगी कोणी दिली तसेच, सुरक्षेच्या नियमांचे पालन केले होते का, असे प्रश्न युनियनने उपस्थित केले आहेत. दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी. तसेच, या गंभीर घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे रवींद्र रेड्डी यांनी केली आहे..या संदर्भात चौकशी करण्यात येत आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. न्यायवैद्यक अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणत्या वस्तूचा स्फोट झाला आणि नेमके कारण स्पष्ट होइल.- रवींद्र काळे, सहाय्यक निरीक्षक, खडकी पोलिस ठाणे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.