esakal | किरकटवाडी येथे गॅस गळतीमुळे स्फोट; दोन महिलांसह दोन मुले होरपळली
sakal

बोलून बातमी शोधा

kirkitwadi

किरकटवाडी येथे गॅस गळतीमुळे स्फोट; दोन महिलांसह दोन मुले होरपळली

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील करंजावणे वस्ती येथे स्वयंपाकाच्या गॅसची गळती होऊन आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला यामध्ये दोन महिला व दोन मुले होरपळले आहेत. पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

हेही वाचा: Lakhimpur : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलाला अटक

शुभांगी पासलकर त्यांचा एक मुलगा व एक मुलगी आणि मिनाक्षी नेवासकर अशी जखमींची नावं असून त्यांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नेवासकर यांच्या घरातून गॅसचा वास येत असल्याने शेजारी राहणाऱ्या शुभांगी पासलकर या पाहण्यासाठी गेल्या असता मोठा स्फोट झाला. त्यावेळी नेवासकर यांच्यासह शुभांगी पासलकर व त्यांची दोन मुले हे चौघेही आगीत होरपळले. घरातील कपडे व इतर वस्तूही मोठ्या प्रमाणात जळाल्या आहेत.

हेही वाचा: Lakhimpur : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलाला अटक

स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की परिसरात हादरा बसला. आवाज ऐकून स्थानिक तात्काळ मदतीसाठी धावले व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सनसिटी अग्निशमन केंद्राचे संदिप पवार, संजय चव्हाण, रमेश चव्हाण, नितीन मोकाशी व चालक क्षीरसागर यांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.

loading image
go to top