esakal | Coronavirus : द्रुतगती, टोलनाक्‍यांसह रेल्वेवर ‘वॉच’

बोलून बातमी शोधा

Tollnaka-Watch

पथकांवर जबाबदारी

 • टोलनाक्‍यावरून जाणाऱ्या वाहनांची दिवसरात्र तपासणी.
 • परदेशातून प्रवास करून आलेले; परंतु तपासणी न झालेल्यांची माहिती घेणार.
 • तपासणी झालेली नसल्यास त्या प्रवाशांची तपासणी करणार.
 • त्यांच्या हातावर १४ दिवस क्वॉरंटाइनचा शिक्का मारणार. 
 • पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल अथवा डॉ. नायडू रुग्णालयात पाठवणार.
 • तपासणी झालेली असेल आणि हातावर १४ दिवस क्वॉरंटाइनचा शिक्का असेल, तरीही प्रवास करणाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवणार. 
 • रेल्वे स्टेशनवरही अशाच प्रकारे कार्यवाही होणार.

Coronavirus : द्रुतगती, टोलनाक्‍यांसह रेल्वेवर ‘वॉच’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील टोलनाक्‍यांवर पथके नेमली आहेत. परदेशातून आलेल्या; परंतु तपासणी न झालेल्या अथवा विलगीकरणाचा सल्ला डावलून प्रवास करणाऱ्यांवर ही पथके लक्ष ठेवणार आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या काही दिवसांत परदेशातून आलेले प्रवासी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर रेल्वे आणि खासगी गाड्यांतून इतर शहरात प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले होते. तर काही प्रवाशांची तपासणी न झाल्याचे दिसून आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने रेल्वे आणि महामार्गावर खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता.