पाचवी, आठवी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जास मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या पाचवी आणि आठवीमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या पाचवी आणि आठवीमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

यापूर्वी प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट होती. विद्यार्थ्यांनी २ ते १८ सप्टेंबर या कालावधीत मूळ अर्ज, शुल्क आणि मूळ कागदपत्रे हे संपर्क केंद्र असलेल्या शाळेत जमा करायचे आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येतील. अर्ज भरण्याच्या सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे. या मंडळाच्या पाचवी आणि आठवीसाठी आतापर्यंत सुमारे १३५ जणांनी अर्ज केले आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extended online application deadline for fifth and eighth admissions