esakal | पदविका अभ्यासक्रमाला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

educ.jpg

इयत्ता दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याची मुदत आणखी वाढविण्यात आली आहे.

पदविका अभ्यासक्रमाला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : इयत्ता दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याची मुदत आणखी वाढविण्यात आली आहे. अर्ज करने व  पडताळणीसाठी  ४ सप्टेंबरपर्यत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) दहावीनंतरच्या तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक); तसेच बारावीनंतरच्या फार्मसी, सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अशा डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया १० ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. आज (ता.२५) अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस होता. 

आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरूवात झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना शाळांकडून शैक्षणिक कागदपत्रे व दाखले मिळण्यास विलंब झाला.  त्यामुळे आरक्षीत जागांवर अर्ज भरताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. कागदपत्र मिळत नसल्याने अनेकांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरला
 विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन तंत्रशिक्षण संचालनालयाने अर्ज भरण्यासाठीची मुदत ४ सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. 
 प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी ७ सप्टेंबर रोजी जाहीर होणार असून, त्याबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी १० सप्टेंबर पर्यंत मुदत आहे. 

१२ सप्टेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे, अशी माहिती डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली आहे. 
अधिक माहिती www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

loading image
go to top