
पुणे : राज्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना राष्ट्रीय कौशल्य पात्रता अभ्यासक्रम आराखड्यानुसार रुपांतरित नवीन व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यास दिलेल्या स्थगितीस मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे हा नवीन व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यास शैक्षणिक वर्ष २०२५-२६ आणि २०२६-२७ पर्यंत स्थगिती असणार आहे. तर हा नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून राबविण्यास सुरवात होणार आहे.