pune city Sweeping Increased Roads Cleaned
sakal
पुणे - पुणे शहरातील सार्वजनिक जागा, रस्त्यांवर झाडणकाम करण्यासाठी महापालिकेने कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास दुपटीने वाढवून नवीन धोरण प्रायोगिक तत्त्वावर राबविले जाईल असे जाहीर केले होते. गेल्या तीन महिन्यांत शहरातील स्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे या धोरणाची मुदत आज (ता. ३१) संपत असताना स्थायी समितीच्या बैठकीत यास आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी महापालिकेला प्रति महिना १३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.