कात्रज परिसरातील शाळेकडून विद्यार्थ्यांची पिळवणूक

फी न भरल्याने मागील १० ते १२ दिवसांपासून ऑनलाईन वर्ग बंद
School Fee
School FeeCanva

कात्रज : कात्रज (katraj) परिसरातील भिलारेवाडी (bhilarewadi) हद्दीत असणाऱ्या एका शाळेकडून विद्यार्थ्यांची पिळवणूक सुरू आहे. मागील दहा दिवसांपासून फी न भरल्याने ऑनलाईन वर्ग (online school) बंद आल्याच्या तक्रारी पालक आणि विद्यार्थी करत आहेत. विद्यार्थ्यांना याबाबत केवळ व्हॉट्सॲपवर एक संदेश पाठवून वर्ग बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या संदेशात फीचे कारण सांगून वर्ग बंद करत असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

ऑनलाईन क्लास बंद करत असताना शाळेकडून कोरोना काळात वाढलेल्या खर्चाचे आणि तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करण्यात आले आहे. मात्र या काळात शाळेकडून शिक्षकांच्या पगारही करण्यात आलेला नसल्याचे काही शिक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. अनेक पालकही आपल्या पाल्याचे भविष्यात नुकसान होऊ शकते असा समज धरून स्पष्टपणे बोलण्यास नकार देत आहेत. त्याचबरोबर, शाळेकडून न्यायालयाच्या १५ टक्के शुल्क कपातीलाही केराची टोपली दाखवण्यात आली असून कुठल्याही प्रकारचे शुल्क कपात करून देण्यात आले नसल्याचे पालक सांगत आहेत. मागील काही वर्षापासून या शिक्षण संस्थेने मोठ्या प्रमाणावर मिळकत केलेली आहे. मग कोरोनासारख्या परिस्थितीत पाल्यांना शिक्षण द्यायला काय हरकत आहे असा सवालही काही पालकांनी उपस्थित केला आहे.

School Fee
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गोणपाटाचा पोषाख केलेल्या फोटोची स्टोरी

ज्या पालकांनी पाल्य उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला घेऊन गेल्यानंतर पालकांनी मागील वर्षात पूर्ण शैक्षणिक शुल्क भरण्यात आले असताना त्यांचे परतावा शुल्क कोरोनाचे कारण सांगून शुल्क परत करण्यात नकार देण्यात आला आहे. शासन नियमानुसार शाळेतील कर्मचारी ५० टक्के उपस्थित असून त्यांचे वेतनही ४० ते ५० टक्के आहे. शाळेचा खर्च नियमित खर्चापेक्षा कमी असताना पालकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत असल्याचे काम शाळेकडून चालू असल्याचे पालक ओंकार ईरकर यांनी सांगितले.

न्यायालयाचा आणि शासनाचा आदेश असतानाही शाळेने मनमानी पद्धतीने पालक व विद्यार्थी यांना नाहक त्रास देण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन पद्धतीने वर्ग चालू असताना बंद करून फीसाठी तगादा लावण्यात आला. अशात ज्या पालकांनी फी भरली अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही त्रास होत आहे.

- ओंकार इरकर, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com