होळीसाठी कोकणात जादा एसटी बस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळावी यासाठी पिंपरी-चिंचवड ते तिवरे जादा बस सोडण्यात येणार आहे. सात ते १० मार्चदरम्यान ही विशेष बस धावणार असून, तिचे आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पुणे - होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळावी यासाठी पिंपरी-चिंचवड ते तिवरे जादा बस सोडण्यात येणार आहे. सात ते १० मार्चदरम्यान ही विशेष बस धावणार असून, तिचे आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड, विश्रांतवाडी आणि येरवडा परिसरातील कोकणवासीयांची सोय करण्यासाठी स्व. नानाजीराव शिंदे प्रतिष्ठानच्या पाठपुराव्यानंतर पिंपरी ते चिपळूण तिवरे बस सुरू करण्यात आली होत्या. मात्र पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने ती बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. मात्र होळीनिमित्त काही काळ ही बस पुन्हा सुरू करण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: extra st bus to konkan for holi