क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनतो : भाऊसाहेब रूपनर
SGW26B09405
सांगोला : फॅबटेकमध्ये आयोजित क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना भाऊसाहेब रूपनर. यावेळी उपस्थित डॉ. संजय आदाटे, डॉ. रवींद्र शेंडगे व प्राध्यापक, खेळाडू.
फॅबटेक कॉलेजमध्ये क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, बास्केटबॉल आदी स्पर्धांचे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी डॉ. संजय आदाटे, प्राचार्य रवींद्र शेंडगे, उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर, अॅकॅडमिक डीन डॉ. अनुप विभूते, स्टुडंट डीन डॉ. संजय पवार, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. शरद पवार, क्रीडाशिक्षक यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

