फॅबटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न
SGW26B09363
सांगोला : येथील फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील पालक मेळाव्याचे उद्घाटन करताना प्राध्यापक व पालक प्रतिनिधी.
फॅबटेक पॉलिटेक्निकमध्ये
पालक मेळावा उत्साहात
.......
सांगोला, ता. २७ : फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागात पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य तानाजी बुरूंगले यांनी दिली.
या मेळाव्याचे उद्घाटन विभागप्रमुख प्रा. दत्तात्रय नरळे, पालक प्रतिनिधी पुष्पांजली खटकाळे, विलास मोळक, प्रा. स्वप्नील बंडगर, प्रा. अजयकुमार भोसले, प्रा. श्रीकांत बुरूंगले आदींच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात पालक प्रतिनिधी म्हणून पुष्पांजली खटकाळे, विलास मुळक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांचा हस्ते बक्षीस देऊन करण्यात आला. मेळावा यशस्वी करण्यासाठी विशाल इमडे, समाधान आलदर आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रा. श्रीकांत बुरूंगले यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

