एआय समीट- मुख्यमंत्री (चौकट)
ढिसाळ व्यवस्थापनाचा
फडणवीसांनाही फटका
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २० ः- महाराष्ट्रातील एआय तंत्रज्ञानाशी संबंधित उपक्रमांची घोषणा करण्यासाठी तसेच महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यासाठी दिल्लीत इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासकीय यंत्रणांच्या ढिसाळ नियोजनामुळे तब्बल ४० मिनिटांहून अधिक वेळ भारत मंडपम परिसरातच घुटमळत फिरावे लागले. एआय इम्पॅक्ट समिट १६ फेब्रुवारीपासून सुरू झाली असताना आणि मुख्यमंत्र्यांचा या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी दौरा निश्चित असताना त्यांच्या भेटीगाठींसाठीचे दालन कोणते असेल याबाबतच्या नेमक्या माहितीबद्दल मुख्यमंत्र्यांसोबतची प्रशासकीय यंत्रणा अनभिज्ञ होती. या गोंधळामुळे दोनदा खाली वर करावे लागल्याने मुख्यमंत्री फडणवीस अस्वस्थ झाले होते, मात्र त्यांनी संयतपणे स्थिती हाताळली. ही भटकंती झाल्यानंतर हॉल १४ मध्ये त्यांची बैठक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरळीत मार्गी लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

