
पुण्यातील राजाराम पुलावरून एका तरुणाने मुठा नदीच्या पात्रात उडी घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. इंजिनिअरिंगच्या परीक्षेत सलग तिसऱ्यांदा नापास झाल्याने नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. सुदैवाने, पुणे अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचवण्यात यश आले.