मंचर - अपघाताच्या खोट्या घटनेतून विमा कंपनीकडून भरपाई रक्कम मिळवण्यासाठी खोटी फिर्याद दाखल करणाऱ्या चौघांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मृताच्या वारसांनी आणि इतर आरोपींनी संगनमताने खोटे साक्षीदार उभे करून पोलिसांची आणि विमा कंपनीची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली.