पुणे - हवाई दलाच्या जवानाचा वेश परिधान करून फसवणूक करणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स आणि शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हा प्रकार उघडकीस आला असून, आरोपीकडून संरक्षण दलाशी संबंधित साहित्यही जप्त करण्यात आले आहे.