
पुणे : डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत अमेरिकेतील नागरिकांकडून दररोज लाखो रुपये उकळणाऱ्या खराडीतील बनावट कॉल सेंटरचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. येथे तब्बल १२३ कर्मचारी काम करीत होते. त्यांच्याकडे रोज तब्बल एक लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा देण्यात येत होता, असे पोलिस तपासातून पुढे आले आहे.