bhondu baba rushikesh vaidya
sakal
पुणे - देवाचा अवतार असल्याची बतावणी करून प्रसादातून गुंगीचे औषध देत महिलेवर लैंगिक अत्याचार करून पसार झालेल्या भोंदूबाबाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पिंपरीतून अटक केली आहे. आरोपीने महिलेचे आक्षेपार्ह छायाचित्रे काढून तिला पाठविली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने अशा प्रकारे इतर महिलांसमवेत गैरकृत्य केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.