
खडकवासला : सोमवारी सकाळपासून सोशल मीडियावर “खडकवासला धरणातून आज दुपारी तीन वाजता ५१३६ क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी” असा एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. मात्र हा मेसेज पूर्णतः खोटा व दिशाभूल करणारा असल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी स्पष्ट केले आहे.