
छत्रपती संभाजीनगर : टेंपो चालकाने त्याच्याकडे स्टील पाइपची डिलिव्हरी करून आलेल्या ११ लाखांची रोकड चौघा दुचाकीस्वार चोरट्यांनी लुटल्याचा बनाव केला. याप्रकरणी मालकाच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात अनोळखी चौघांविरोधात गुन्हा नोंद झाला होता. यात सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी २४ तासांतच ही बनवेगिरी उघड करत ११ लाखांची रक्कम चालकाच्या घरातून जप्त केली. राहुल अशोक चव्हाण (२८, रा. रो हाउस ३, सेवालाल चौकाजवळ, नाईकनगर) असे त्या टेम्पो चालक आरोपीचे नाव आहे.